Home My City Nagpur अंबिका नगर व आयोध्या नगर परिसरातील दुर्गानगर मैदानात ‘माझी पण जबाबदारी’

अंबिका नगर व आयोध्या नगर परिसरातील दुर्गानगर मैदानात ‘माझी पण जबाबदारी’

नागपूर : अंबिका नगर व आयोध्या नगर परिसरातील दुर्गानगर मैदानात ‘माझी पण जबाबदारी’ या सामाजिक उपक्रमातून स्वच्छता व सौंदर्यीकरणाची विविध कामे करण्यात आली. सामूहिक प्रयत्नातून मैदानाचे रूप पालटून परिसराला स्वच्छ व सुंदर स्वरूप प्राप्त झाले आहे. मैदानातील वाढलेले गवत, निरुपयोगी झुडपे आणि अनावश्यक वनस्पती हटवून परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच मैदानाचा काही भाग समतल करून तो अधिक सुस्थितीत करण्यात आला. स्वच्छतेनंतर परिसराचे सौंदर्य वाढविण्यासाठी शोभेची आणि पर्यावरणपूरक झाडे लावण्यात आली.
श्री. आशिष गजाननजी डेंगे यांच्या पुढाकारातून ‘माझी पण जबाबदारी’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. मैदानावर नियमित खेळण्यासाठी येणारे खेळाडू तसेच दररोज येणाऱ्या नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत सहकार्य केले.
२० सप्टेंबर २०२६ रोजी मैदान परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सुमारे ८० ते ९० नवीन झाडांची लागवड करण्यात आली. स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून मैदानाचा परिसर अधिक आकर्षक व पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमासाठी आशिष डेंगे, जितेंद्र जयस्वाल, निलेश म्हैसकर, प्रदीप वाघमारे, गोपाल तळेकर, राजू वलथरे, गोपी श्रीवास, अनिकेत पंढरे आणि लोकेश मेश्राम यांनी विशेष सहकार्य केले.नागरिकांच्या सहभागातून सार्वजनिक परिसर स्वच्छ, सुंदर आणि हिरवाईने समृद्ध करण्याचा हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.